‘तुला ना कळे' ही केवळ एक प्रेमकहाणी नाही, तर नियतीच्या वाऱ्यांनी अधुरी ठेवलेली दोन हृदयांची वेदनादायी गोष्ट आहे. या गाण्याची पार्श्वभूमी अहमदाबाद विमान अपघातावर आधारित असून, त्यात एका एअर होस्टेस ची अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. आकाशात झेप घेतलेलं त्याचं प्रेम नियतीने अंधारात लटकवलं हाच भाव या गाण्याद्वारे अनुभवायला मिळणार आहे.
या गाण्यात अजिंक्यसोबत अभिनेत्री श्रेया जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दोघांच्या रसायनातला भावनिक प्रवास आणि प्रेमातील अपूर्णता प्रेक्षकांना नक्कीच स्पर्शून जाईल.
गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने सजवलं आहे प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि शुद्धी कदम यांनी. त्यांच्या गायकीतून उमटणारा भाव, वेदना आणि प्रेमाचं नाजुकपण या गाण्याला एक वेगळीच उंची देतो.
‘तुला ना कळे' या गाण्याचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे सागर सकट यांनी, तर निर्मितीची जबाबदारी वैशाली रंधीर काळे, सागर सूर्यकांत सकट आणि नितीन घुगे यांनी सांभाळली आहे. गाण्याची कविता लिहिली आहे अभिनंदन गायकवाड (A.V.G) आणि सागर सकट यांनी, तर संगीत दिग्दर्शन देखील अभिनंदन गायकवाड (A.V.G) यांनीच केलं असून, संगीत संयोजन मिलिंद मोरे यांनी केलं आहे.
कॅमेऱ्यामागे उत्तम दृश्यासाठी DOP उत्कर्ष घोगले यांची कुशल नजर लाभली आहे, तर सागर पवार यांनी सहाय्यक DOP आणि रील हँडलर म्हणून योगदान दिलं आहे. या गाण्याचे असोसिएट डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून रसिक वाघमारे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. गाण्याचं छायाचित्रण ओंकार सुवारे आणि राहुल सैतावङेकर यांनी केलं असून, मेकअप प्राजक्ता मोहिते यांनी केला आहे.
गाण्याच्या कलाकारांमध्ये प्रद्न्या कदम, वैशाली जाधव, विजय सोनगिरे, प्रथमेश कदम, किरण राऊत, आशुतोष कांबळे, केतन खरात आणि प्राजक्ता मोहिते यांचा समावेश आहे.
भावनांनी ओथंबलेलं, वास्तव घटनेवर आधारित आणि हृदयाला भिडणारं हे गाणं ‘तुला ना कळे’ प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करेल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
हे गाणं १२ नोव्हेंबरला SNV Studioo या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार असून, त्याची झलक सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

0 टिप्पण्या