मराठी सिनेसृष्टीतील बहुगुणी आणि सदैव चर्चेत राहणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोस्टने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
अमृताची पोस्ट, आणि निर्माण झालेलं कुतूहल
फॅशन, नृत्य आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारी अमृता खानविलकर नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. तिच्या प्रत्येक कलाकृतीला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा तिच्या लोकप्रियतेचा पुरावा.
आता वाढदिवसानिमित्त अमृताने शेअर केलेल्या संदेशामध्ये ती लिहिते
“तुमच्या सगळ्या प्रेमासाठी मनापासून आभार! नव्या वर्षात मी अतिशय कृतज्ञ भावनेने पाऊल टाकत आहे. नवी स्वप्नं, नवी ऊर्जा आणि ‘अमुल्य बाय अमृता’ या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. 2026 मध्ये माझ्या मनाच्या अगदी जवळची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतेय.”
या ओळी पाहताच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं
नेमकं काय आहे हे "अमुल्य बाय अमृता"?
नव्या प्रोजेक्टची घोषणा?
की पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा उपक्रम?
अमृताने नेहमीच तिच्या क्रिएटिव्ह आयडियांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टमधील संकेत आता सिनेसृष्टीतही चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.
2026 मध्ये अमृताकडून काय नवीन? उत्सुकता ताणल्या जातेय…
अमृताच्या या सस्पेन्सफुल पोस्टनं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, “अमुल्य बाय अमृता” हा नेमका कोणता प्रकल्प असणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
फॅशन ब्रँड? कंटेंट सीरिज? लाइफस्टाईल प्रोजेक्ट? की नवीन चित्रपटाची अनोखी घोषणा?
अजून कोणतेही अधिकृत तपशील हाती नसले तरी अमृताच्या बर्थडे अनाउन्समेंटमुळे 2026 हे वर्ष तिच्या चाहत्यांसाठी खास ठरणार हे नक्की.

0 टिप्पण्या