मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि मानवी नात्यांची बारकाईने मांडणी करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. गाव–खेड्यांच्या संस्कृतीवर आधारित असलेला ‘कलवरी’ हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
“लग्न म्हटलं की कलवरी” जुन्या काळातील ग्रामीण परंपरेवर आधारित ही कहाणी एका अशा क्षणाभोवती फिरते, जो संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.
ग्रामीण कथेवर आधारित ‘कलवरी’ मध्ये राहुल दराडे, राजेश्वरी खरात आणि अंकिता राऊत या त्रिकुटाची मुख्य भूमिका प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप बी. टोंगे आणि मंगेश शेंडगे यांनी संयुक्तपणे केले असून, गावाकडच्या लग्नाची रेखीव, अस्सल आणि जिवंत मांडणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे. आजच्या बदलत्या काळात ही प्रथा जरी फारशी दिसत नसली तरी त्यातून जन्मणाऱ्या भावना, ताणतणाव, गैरसमज आणि कुटुंबातील नातेसंबंध यांची गुंतागुंत कलवरी प्रभावीपणे दाखवतो. चित्रपटातील ‘सांग तुझ्या मागं’ आणि ‘मखमली’ ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत, तर जसराज जोशी यांनी गायलेले ‘रंग हळदीला’ हे गाणं हळदीच्या रील्सचा हिट ट्रॅक ठरत आहे.
फँड्रीमध्ये जब्या-शालू म्हणून ओळख निर्माण केलेली राजेश्वरी खरात आणि सोमनाथ आवघडे ही लोकप्रिय जोडी ‘कलावरी’मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘कलवरी’ या चित्रपटात राहुल दराडे, राजेश्वरी खरात, अंकिता राऊत, अपेक्षा चव्हाण, सुजित चौरे, सोमनाथ आवघडे, प्रदीप टोंगे, मंगेश शेंडगे, रवींद्र वावळ, विकास कुटे, ऐश्वर्या अनिल, सुप्रिया सोनवणे, नितीन वेताळ, सिद्धेश्वर झडबुके, दत्ता उबाले, विजय नेलवडे, राम पैठणे, ज्योती जवळे, अनीता मोरे, प्रदीप जेधे आणि हर्षल पवार अशी मोठी कलाकारांची फळी झळकणार आहे.
‘कलावरी’ या चित्रपटाची निर्मिती सुद्धा तितकीच भक्कम आणि अनुभवी हातांनी घडवली आहे. या चित्रपटाचे निर्माते विकास कुटे, रोहित बेलदरे आणि राणी प्रदीप टोंगे असून, त्यांनी चित्रपटाला आवश्यक तेवढा दांडगा पाठिंबा आणि भक्कम टीमवर्क दिले आहे. विषयाची संवेदनशीलता, कथानकाची वास्तववादी मांडणी आणि नवीन कलाकारांना योग्य व्यासपीठ देण्याची इच्छा या तिन्ही निर्मात्यांनी समान पद्धतीने जपली आहे. त्यामुळे ‘कलावरी’ हा केवळ एक चित्रपट न ठरता—एक मनापासून उभा केलेला प्रकल्प म्हणूनही उभा राहतो.
चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर राणी प्रदीप टोंगे असून कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रदीप बालासाहेब टोंगे आणि महेश वैजनाथ शेंडगे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विकस सिंह यांनी केले असून संगीतात ओंकारस्वरूप बगडे, जसराज जोशी, सौमी शैलश आणि शाहिर रामानंद उगले यांच्या आवाजातील गाणी आहेत. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, मायकल आणि बाबन अडगले यांनी केले आहे. आर्ट डायरेक्शनची जबाबदारी शितल कोलप यांनी सांभाळली तर संपादन रवींद्र वावळ यांनी केले आहे. कॉस्च्युम डिझायनर म्हणून दीप्ती बंगार आणि मेकअप डिझायनर म्हणून निकिता म्हस्के यांनी काम पाहिले आहे. पब्लिसिटी डिझाइन RAA Films Pure Entertainment यांनी तयार केली आहे. चित्रपटाच्या DI आणि साउंड डिझाइनवर रवींद्र वावळ व आदित्य शिवापुरकर यांनी काम केले असून सिंक साउंड आकाश भुतकर यांचे आहे. ऑडिओ पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आदित्य शिवापुरकर आणि हर्ष K यांचे योगदान आहे. ऑडिओ री-सिंकही आदित्य शिवापुरकर यांनी केले असून रि-रेकॉर्डिंग मिक्सिंग प्रसाद पवार यांनी हाताळले आहे. चित्रपटाचे सराउंड मिक्सिंग Media Bridge स्टुडिओमध्ये झाले असून ऑडिओ पोस्ट प्रॉडक्शन Mediaworks स्टुडिओमध्ये पूर्ण झाले आहे.
.png)
.png)

0 टिप्पण्या