विकास कुटे निर्मित कलवरी चित्रपटाचे प्रोमोशन जोरात सुरु...

 

सध्या कलवरी या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात या चित्रपटात प्रथमच अभिनेता राहुल दराडे व अभिनेत्री राजेश्वरी खरात अशी नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. कलवरी ही एक अनोखी संकल्पना जी सगळीकडे खूप प्रचलित आहे ती प्रथमच मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गाणी देखील रिलीज झालेली आहेत. ती सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

28 नोव्हेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होत असलेल्या कलवरी चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच सुरू झाले असुन थोड्याच कालावधीत चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात कलवरी चित्रपट टिमला यश मिळत असल्याचे  दिसून  येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युट्यूबवर अक्षरशः परमोशन चा धुमाकुळ घालत असल्याचे दिसुन येत आहे. कलवरी चित्रपट टिम अगदी शहरापासून गावातल्या शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत असल्याचे दिसून येत आहे . तसेच या चित्रपटातील गाणी तुम्हाला K-Mines Music या यूट्यूब चैनल वर पाहायला मिळतील.

या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सध्या कलवरीच्या टीमने महाराष्ट्र दौरा केला आणि त्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. गावागावात त्यांच जंगी स्वागत करण्यात आल. त्याचबरोबर प्रेक्षक कलवरी हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत हे समजलं. या चित्रपटाचे निर्माते विकास तुकाराम कुटे यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच चित्रपटगृहात सगळीकडे कलवरीचे पोस्टर पुढे लावले आहेत आणि त्यातूनच प्रेक्षकांच प्रेम दिसून येत. त्यांचा दौरा हा जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, आंबेजोगाई, छत्रपती संभाजीनगर इत्यादी शहरात तसेच खेडेगावातून करण्यात आला. भोळ्या भाबड्या प्रेक्षकांच कलाकारांवर असलेलं प्रेम बघून कलवरी टीम भावुक झाली.

छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देखील कलवरीचे पोस्टर हातात घेऊन संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माननीय आदित्य ठाकरे देखील तेथे उपस्थित होते.

परभणी मध्ये देखील फटाके वाजवून व गावकऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं  व शुभेच्छा दिल्या. तसेच करवीर निवासिनी कोल्हापूर वासियांकडून देखील जंगी स्वागत करण्यात आलं.

RAA films and K mines music creations प्रस्तुत कलवरी हा चित्रपट येत्या 28 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ट्रेलर मधुन चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आणि चित्रपट बनवण्याचा उद्देश सफल होईल हे निश्चित आहे .

चित्रपटात नव्या आणि अनुभवी कलाकारांची मस्त सांगड घातल्याचे दिसते. डायरेक्टर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे तयारीचे दिग्दर्शक असून विकास कुटे निर्मित कलवरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. कलाकार राजेश्वरी खरात, राहूल दराडे, अश्विनी इरोळे, सुजित चौरे, सिध्देश्वर झाडबुके, अंकीता राऊत, दत्ता उबाळे,  माणिक काळे असे सत्तर पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात आहेत. तसेच इतर निर्माते रोहीत बेलदरे राणी टोणगे यांचेही सहकार्य लाभत आहे.

28 नोव्हेंबर ला सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन "कलवरी" चित्रपट पहावा असे अवाहन निर्माता विकास कुटे यांनी केले आहे. तर हा चित्रपट खास आहे, अनोखा आहे. 28 नोव्हेंबरला आम्ही येतोय, तुम्ही पण या... भेटूया चित्रपटगृहात!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या