चक्क सलमान खानने जाहीर केला मराठी बिग बॉसचा होस्ट!
सध्या सगळीकडेच उत्सुकता आणि वाट पाहिली जाते ती म्हणजे बिग बॉस मराठी पर्व ६. त्यातच बिग बॉस मराठी सीजन ६ चा टीचर रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र उत्साहाची लाट पसरली. परंतु त्यानंतर यंदा बिग बॉस मराठी सीजन ६ याचे होस्ट कोण करणार, हा एकच प्रश्न प्रेक्षकांमध्ये होता. अभिनेता महेश मांजरेकर व अभिनेता रितेश देशमुख अशी दोन नावे प्रेक्षकांकडून येत होती.
पण बऱ्याच प्रेक्षकांनी यावर्षी देखील भाऊ म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख यांनी हा सीजन होस्ट करावा अशा काही कमेंट्स पाहायला मिळत होत्या. आणि अखेर त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे कारण सलमान खान यांनी या वर्षाची सर्वात मोठी घोषणा करून अभिनेता रितेश देशमुख यावर्षी बिग बॉस मराठी सीजन 6 याचे सूत्रसंचालन करणार अस स्पष्टपणे सांगितलं.
देशभरातून प्रेक्षकांच्या आवडीचे हे दोन सुपरस्टार अगदी एकाच मंचावर आल्यामुळे हा क्षण प्रेक्षकांसाठी एक सोहळा होता. अगदी दबंग स्टाईल मध्ये बिग बॉस हिंदी च्या मंचावर अभिनेता सलमान खान यांनी रितेश देशमुख यांचे स्वागत केले आणि आता बिग बॉस हिंदी संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्याची खूप मोठी जबाबदारी तू तुझा अंगावर घेतली आहेस असं म्हणत सलमान खान यांनी रितेश देशमुख यांची पाठ थोपटली.
रितेश देशमुख म्हणाले पहिले तर तुम्हाला ब्लॉकबस्टर सीजन साठी खूप खूप शुभेच्छा. मी रोज बघतोय सगळ्यांना देखील हा सीझन प्रचंड आवडतोय. यावेळेस मराठी सीजन मध्ये आपण एका दरवाज्यातून सदस्यांचे स्वागत करतो पण आता आत गेल्यानंतर खूप दरवाजे त्यांचे स्वागत करणार आहेत आणि प्रत्येक दरवाजामध्ये काहीतरी वेगळ लपलेल असणार आहे. काही वेळेस चांगल्या गोष्टी असतील तर काही वेळेस शॉकिंग असेल. तसेच मराठी बिग बॉस सीजन 5 च्या देखील सलमान खान यांनी कौतुक केले आणि येणाऱ्या सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे की नक्की या सीजनमध्ये कंटेस्टंट म्हणून कोण कोण बघायला मिळणार.
काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री इशा केस्कर, अभिनेता तुषार साळी, अभिनेता संतोष जुवेकर, मराठी कन्टेन्ट क्रिएटर विराज अवचिते, मराठीतील DJ अजय लोबो, नृत्यांगना गौतमी पाटील, कलाकार विनायक माळी, इत्यादी नावे समोर आली आहेत. परंतु अजून ऑफिशियल दृष्ट्या कोणतीही नावे समोर आलेली नाहीत. तर मंडळी येणाऱ्या मराठी बिग बॉस पर्व 6 यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

0 टिप्पण्या