यंदाचा बिग बॉस हिंदी सीजन 19 हा प्रचंड गाजतोय. अभिनेता सलमान खान या बिग बॉसचे होस्ट करत आहें. यावेळी एक खास गोष्ट म्हणजे सर्वांचा लाडका स्टँड अप कॉमेडीयन प्रणित मोरे हा कंटेस्टंट म्हणून हिंदी बिग बॉस 19 या पर्वामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा खेळ, कणखरपणा तसेच योग्य गोष्टीसाठी स्टॅन्ड घेत, योग्य ठिकाणी तो योग्य व्यक्तीच्या पाठीशी राहत होता.
प्रणित मोरे यांच्या सर्व चाहत्यांना, ज्या पद्धतीने तो त्याचे टास्क पूर्ण करत होता ते प्रचंड आवडत होत. त्याचसोबत होस्ट सलमान खान यांनी देखील बऱ्याच वेळेला प्रणितचं भरभरून कौतुक केलं होतं. येणारे गेस्ट देखील प्रणिता खेळ पाहून त्याचं कौतुक करत होते. परंतु त्याच्या चाहत्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वाईट बातमी म्हणजेच प्रणित मोरे याचा हिंदी बिग बॉस 19 या पर्वांमधून त्याची एक्झिट झाली. रविवारी त्याचा हा संपूर्ण प्रवास संपला. त्याच्या एक्झिट मुळे त्याचे चाहते आणि घरातील सदस्य देखील खूप नाराज झाले कारण प्रणित शेवटपर्यंत या खेळात असणार आणि तोच या पर्वाचा विजेता होणार असं सर्वांना वाटत होतं. त्याला डेंग्यू झाला आणि त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदाच त्यांना नवीन अशी पोस्ट केली आहे. प्रणितला रुग्णालयात दाखल केले आणि सध्या तो डेंग्यूवर उपचार घेतोय.
मला असं वाटतंय की प्रणितला घराबाहेर काढण्याचा निर्णय हा तात्पुरता असू शकतो आणि तो बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला बिग बॉस 19 या परवा मध्ये पुन्हा एकदा पार्टिसिपेट करता येऊ शकतो. पण हे सगळं त्याच्या आरोग्यावर अवलंबून आहे. नुकताच तो या घरचा कॅप्टन झाला होता आणि त्यातच त्याला असं अनपेक्षित पणे बाहेर पडावं लागलं. प्रणित ने एक पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृती बद्दल माहिती दिली आहे. तो म्हणतो, "माझी तब्येत आता ठीक आहे, आणि त्याचबरोबर बिग बॉस टीमच्या सतत मी संपर्कात आहे. तुम्ही दिलेलं प्रेम,पाठिंबा आणि प्रार्थनांसाठी खूप खूप आभार.जय हिंद जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आली आहे."
प्रणितला वैद्यकीय कारणांमुळे आता घराबाहेर पडावं लागलं अशी घोषणा खुद्द सलमान खान यांनी केलेली आहे पण यानंतर तो पुन्हा बिग बॉस पर्व 19 यामध्ये परतणार का हा प्रश्न अजूनही गुलदस्तात आहे. आपण एवढीच प्रार्थना करूया की प्रणित लवकर बरा होऊ देत आणि पुन्हा त्याचा हा अविस्मरणीय खेळ आपल्याला हिंदी बिग बॉस पर्व 19 मध्ये पाहायला मिळेल.
तुम्ही किती उत्सुक आहात पुन्हा प्रणितला हिंदी बिग बॉस पर्व 19 यामध्ये पाहायला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
.png)
0 टिप्पण्या